शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९

मी मराठा आहे!होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले। मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला". दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत. इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात"...

अजुन वेळ गेलेली नाहीय जरा बदला स्वताला काय होतो आपन काय झालो आपन हे जीवन जगण्यापेक्षा आपन नाही जगलो तरी चालेल पन उद्याचे भविष घडविनारच ..........!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा